दरवाढीमुळे भाविकांच्या खिशाला खात्री : फुलांची आवक मंदावली
निपाणी(वार्ता) : गणेशोत्सवा पाठोपाठ गुरुवारी (ता.२१) जेष्ठा गौरींचे (महालक्ष्मी) आगमन झाले आहे. त्यामुळे निपाणी बाजारात फुलांची मागणी वाढली असून आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. परिणामी गौरीच्या फुलांच्या हारांच्या जोडीचे दरही वधारले असून १२०० रुपयापर्यंत गेले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसापासून हारांची बुकिंग असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात गौराईचे आगमन होते. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून हारांना मागणी वाढली आहे. गौरीसाठी हार , वेणी, गजरा, पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यावर भर आहे. त्यामुळे बाजारांमध्ये फुलांची मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्यात ८० ते ९० रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या निशिगंधासाठी आता १५० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये प्रती किलो ३० रुपयांपेक्षा कमी दराने उपलब्ध होणारी झेंडूची फुलांना देखील ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. याशिवाय देशी गुलाब १००० ते १२०० रुपये शेकडा, शिर्डी गुलाब ११०० ते १२०० रुपये शेकडा दराने उपलब्ध आहेत . शनिवारी घरोघरी गौरींचे (महालक्ष्मी) आगमन झाले. गौरींसमोरील सजावट साहित्य, फुलांचे हार, पूजा साहित्य, फळे, नैवेद्यासाठीच्या भाजी असे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. यंदा पाऊस नसल्याने फुलांचे उत्पादन कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
——————————————————————-
प्रथमच उच्चांकी दर
गेल्या दोन तीन वर्षापासून निपाणी परिसरात कोरोनाचे सावट असल्याने गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. यावर्षी सर्व निर्बंध हटवल्याने उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. त्यामुळे फुले आणि हारांची मागणी वाढली असून आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. गौरीचे हार जोडी ३०० रुपयापासून १२०० रुपयापर्यंत झाले आहेत झाले आहेत. त याशिवाय नेहमी मिळणारे पांढरे गजरे २० रुपयावरून ३० तर रंगीत गजरे ३० रुपयावरून ५० रुपये झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta