आर. वाय. मधुसागर; निपाणीत जनसंपर्क अभियान
निपाणी (वार्ता) : ग्राहकांची मागणी आणि सरकारी विशेषाधिकार सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने संपूर्ण भारतभर पसरलेल्या पोस्टल विभागाचे काम सुरू आहे. टपाल खाते आता अत्याधुनिक झाले असून विविध सेवा तात्काळ दिल्या जात आहेत. सर्व योजना एकाच छताखाली आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन चिकोडी येथील टपाल विभागाचे अधिक्षक आर.वाय. मधुसागर यांनी केले. येथील टपाल कार्यालयात आयोजित टपाल जनसंपर्क अभियान कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सारापुरे यांनी स्वागत केले. तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी, विविध सेवा एकाच ठिकाणी मिळण्याचे टपाल विभाग हे एकमेव ठिकाण आहे. हे कार्यालय केंद्र व राज्य सरकारचा एक भाग असून भ्रष्टाचार मुक्त कारभार सुरू आहे. या विभागाच्या योजनांचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. मंडळ पोलीस निरीक्षक बी.एस. तलवार म्हणाले, खाजगीकरणाच्या युगात टपाल कार्यालय टिकून असून ग्राहकांना चांगली सेवा देत आहे. या विभागाच्या योजनेबाबत नागरिकांनी जनजागृती करावी. दर्शन उपाध्ये यांनी, टपाल विभागातर्फे ग्रामीण भागातही विविध सेवा तात्काळ दिल्या जात आहेत. सर्वच ठिकाणी ऑनलाइन सुविधा असून विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
टपाल विभागाची सविस्तर माहिती दिली. दीपक कांबळे यांनी टपाल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विमा योजनांची माहिती दिली.यावेळी विनायक कटावे, माजी नगराध्यक्ष सुनीता लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट कार्याबद्दल सचिन झिपरे यांचा सत्कार झाला.
यावेळी चिकोडी टपाल विभागाचे सहाय्यक एस. ए. सारापुरे, निपाणी टपाल कार्यालयातील पोस्टमास्तर जी. एल. कांबळे, डी. एस. अलबाळ, एस. एन. कोकणे, प्रियांका पाटील यांच्यासह निपाणी व ग्रामीण भागातील टपाल कार्यालयातील पोस्टमास्तर व कर्मचारी उपस्थित होते. एम. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. एम. पुजारी यांनी आभार मानले.