निपाणी (वार्ता) : चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातर्फे रायबाग येथील कर्नाटक पब्लिक स्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान वस्तू प्रदर्शन पार पडले. त्यामध्ये ए. एस. पाटील हायस्कूल स्तवनिधी शाळेचा ‘पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान’या विभागांमध्ये सादर केलेल्या प्रयोगाला द्वितिय क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये शाळेचे श्रीहरी काळेबेरे व प्रणव पट्टणकुडे या दोघांनी भाग घेतला होता. दोन्ही विद्यार्थ्यांना रायबाग शैक्षणिक क्षेत्र कार्यालयाचे गटशिक्षणाधिकारी शांताराम जोगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दोन्ही विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक डॉ. आर. ए. तावदारे व पी. आर. मोळे यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे संचालक महावीर पाटील, ए. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ यांचे प्रोत्साहन लाभले.