
तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : इतर क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये ही देश उत्तम स्थानावर आहे. विविध प्रकारच्या खेळामुळे मानसिक स्थिती चांगली राहून आरोग्य निरोगी राहते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात गुंतून न राहता क्रीडा क्षेत्राकडेही वळावे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. बेळगाव जिल्हा पंचायत, निपाणी तालुका पंचायत आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या तालुका पातळीवरील प्रज्ञाशोध आणि क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करून खासदार जोल्ले बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन करण्यासह हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले. गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी स्वागत तर शारीरिक गटशिक्षणाधिकारी शांताराम जोगळे यांनी प्रास्ताविक केले.
प्रज्ञाशोध आणि क्रीडा स्पर्धेत निपाणी तालुक्यातील १९ विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, तहसीलदार मुजफ्फर बळीगार, आयुक्त जगदीश हुलगेज्जी, प्रणव मानवी, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी डॉ. रवीकुमार हुकेरी, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, सुनील शेवाळे, एम.वाय. गोकार, सदाशिव वडर, पी. पी. कांबळे, एस. एम. पडलिहाळे, अरविंद कांबळे, बी.एच. लंगोटी, डी. टी. हेगडे, एस. आर. नुरजे, एस. बी. हाडकर, बाबुराव मलाबादे, आर. एस. कोकणे पी. डी. पवार, एस. एन. बुरलट्टी,एस. एस. यलट्टी यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आर. ए. कागे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta