प्रा. डॉ. अच्युत माने; निपाणीत विविध ठिकाणी गांधी जयंती
निपाणी (वार्ता) : महात्मा गांधीजींनी नैतिकतेतून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. हे स्वातंत्र्य आबाधीत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अहिंसा मार्गाने त्यांनी इंग्रजांना हाकलून देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या कार्याचे स्मरण होण्यासह प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीचे काम व्हावे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. येथील गांधी चौकात आयोजित महात्मा गांधी जयंती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी डॉ. माने व मान्यवरांच्या हस्ते गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा. एन. आय. खोत, जयराम मिरजकर, कॉम्रेड सी. ए. खराडे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा. नानासाहेब जामदार, आनंद संकपाळ, मधुकर पाटील, तात्यासाहेब पाटील, सुरेश पाटील, रियाज बागवान, प्रशांत गुंडे, सुधाकर माने, रवींद्र नाईक, राजेंद्र पाटील, प्रमोद निर्मळे, अय्याज पठाण, राजू घाटगे, कबीर वराळे, तुकाराम कोळी, श्रेया खेडेकर, मीना नेर्ले यांच्यासह कार्यक नागरिक उपस्थित होते.
येथील गांधी चौक आणि नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात आयोजित महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमात नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते प्रतिमा आणि पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, दत्ता जोत्रे, रवी कदम, उदय नाईक, सोनल कोठडीया, कावेरी मिरजे, दीपक माने अभय मानवी, राजेश कोठडीया गणू गोसावी, सोनाली उपाध्ये, आयुक्त जगदीश हुलगेज्जी, पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर प्रवीण कणगले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उत्तम चव्हाण यांनी आभार मानले.
येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तहसीलदार कार्यालयात तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यावेळी तहसीलदार प्रवीण कारंडे, आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड, एम. बी. डंगी, दयानंद घोबडे, आनंद मडिवाळ व कर्मचारी उपस्थित होते.