
आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज; बोरगावमध्ये दशलक्षण पर्व निमित्त मिरवणूक
निपाणी (वार्ता) : जगणे सोपे असून प्राणी आणि पक्षी देखील जगतात. परंतु जीवन घडविण्याची कला शिकणे सोपे नाही. जो ही कला शिकतो तो जीवनाचा आनंद घेऊ शकतो. शुद्ध जीवन जगण्यात खरा धर्म असून सर्वांनी माणुसकीच्या दृष्टीने समाजात कार्य केले पाहिजे, असे मत आचार्य श्री १०८ कुलरत्न भूषण मुनी महाराजांनी व्यक्त केले. बोरगाव येथील येथील १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरतर्फे आयोजित मिरवणुकीचे उद्घाटन करून ते बोलत होते.
सहकार रत्न रावसाहेब पाटील कुटुंबीयांकडून आचार्य श्रींचे पादपूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.उत्तम पाटील यांनी, सकारात्मक ऊर्जा जगण्याला बळ देत असते. त्यामुळे नेहमी सकारात्मक ऊर्जा बाळगून कार्य केले पाहिजे. मानव जातीच्या कल्याणासाठी सुख-समृद्धीसाठी नोपीचे आयोजन केले होते. जैन धर्म अमर राहावा. मंदिरात रोज पूजा आर्चा होऊन श्रावक-श्राविकांचे आरोग्य चांगले राहावे, या भावनेतून १६ दिवस धार्मिक कार्यक्रम करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमास मीनाक्षी पाटील, अभिनंदन पाटील, अभयकुमार करोले, पृथ्वीराज पाटील, विद्याधर अम्मन्नवर, अण्णासाहेब भोजकर, अभयकुमार मगदूम, अशोक पाटील, राजू मगदूम, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, बाळासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, डॉ. राजगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, सुरेश बंकापुरे, सुजाता पाटील, अनिल पाटील, बाळासाहेब हावले यांच्यासह वीर सेवा दल, वितराग महिला मंडळाच्या पदाधिकारी व सर्व श्रावक -श्राविका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta