
वाहनधारकांतून नाराजी : साईड पट्टीचे काम करा
कोगनोळी : मत्तिवडे तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गापासून ते गावापर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसापासून दुरावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत. यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी ताबडतोब लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ते मत्तिवडेपर्यंतचा सुमारे दोन किलोमीटरच्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी घातलेल्या पाईपलाईन मुळे मोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात उगवल्याने वळणावरून येताना समोरून आलेले वाहन दिसेनासे झाले आहे. रस्ता केल्यापासून आतापर्यंत या रस्त्याच्या साईड पट्ट्याचे काम संबंधित ठेकेदाराने न केल्याने वाहानधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यालगत असणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता वाहतुकीस अडचणीचा ठरला आहे.
यासाठी प्रशासनाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
—————————————————————–
राष्ट्रीय महामार्ग ते मत्तिवडे येथे असणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येणाऱ्या आठ दिवसांमध्ये रस्त्याचे काम करून न दिल्यास आंदोलन करण्यात येईल.
श्री. प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते मत्तिवडे.
——————————————————————-
रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याचे काम करून मिळावे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
श्री. शरद भोसले, शेतकरी मत्तिवडे.
Belgaum Varta Belgaum Varta