
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य कामगार मंत्री संतोष लाड यांनी विविध क्षेत्रातील संघटनांच्या महत्वाच्या मागण्या विषयी चर्चा आणि बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि निपाणी येथील रिक्षा असोसिएशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य अध्यक्ष गजानन खापे, सेक्रेटरी अब्दुलभाई मेस्त्री -दुबईवाले बेळगाव आणि निपाणी तालुका अध्यक्ष शिवराज हुक्केरी यांच्या यांच्या हस्ते मंत्री लाड यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यासमवेत सकारात्मक चर्चा करून तीन महिन्यात समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
रिक्षा, टॅक्सी चालकांना लेबर कार्ड मिळावे. ईएसआय हॉस्पिटल सवलती मिळाव्यात. ऑटो कॉलनीचा प्रलंबित प्रस्ताव लवकरच मार्गी लावावा. एक वर्षापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मिळणारा विमा कवच बंद असलेला विमा पुन्हा चालू करवा. जिल्हा परवाना मिळावा. वाहन विमा कमी करावा. प्रादेशिक वाहतूक कार्यालयातील सर्व कामे फक्त सरकारी शुलकामध्येच व्हावीत. विद्यार्थी वेतन पहिली पासून उच्च शिक्षणापर्यंत मिळावे. रिक्षाची किंमत कमी करून नवीन रिक्षा खरीदी करताना आणि सुटे भाग घेताना घेतली जाणारी जीएसटी बंद करावी. स्त्री शक्ती योजनेमुळे रिक्षा चालकांचे उत्पन्न घटले असून आर्थिक नुकसान होत आहे. तरी सरकारकडून प्रेत्येक रिक्षा टॅक्सी चालकास १० हजार प्रति महिना साहाय्य धन मदत मिळावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. बैठकीस कामगार आयुक्त गोपाळ कृष्ण, कामगार विभाग सेक्रेटरी भारती, डेप्युटी कमिशनर नागेश यांच्यासह ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta