
बेनाडीतील मधाळे कुटुंबीयांचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता. निपाणी) येथील कै. अण्णाप्पा धोंडीबा मधाळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बेनाडी येथील श्रीकाडसिद्धेश्वर हायस्कूल मधील गरीब, हुशार विद्यार्थिनींना पांडुरंग मधाळे, राजू मधाळे परिवाराकडून विद्यार्थिनींना येणाऱ्या शालेय वार्षिक खर्चाची रक्कम दिली.
दोन वर्षांपूर्वी अण्णाप्पा मधाळे यांचे निधन झाले. त्यावेळी मधाळे कुटुंबीयांनी, रक्षाविसर्जन श्राद्ध या विधींना फाटा देऊन गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडी देणगी दिली होती. मत्तीवडे येथील अनाथ आश्रमालाजीवनावश्यक वस्तू व ११ हजार रुपये रोख देऊन मदत करण्यात आली होती.
यावर्षी स्मृतिदिनानिमित्त इयत्ता आठवी मधील सोनाली संदीप वराळे (बेनाडी), नववी मधील प्रतीक्षा विकास हेगडे (कुन्नूर), श्रावणी संदीप कांबळे (हंचिनाळ), दहावी मधील, वैष्णवी सुरेश वराळे (बेनाडी), वैष्णवी बाबुराव कांबळे (हंचिनाळ), रोहिणी महादेव नोकरे (सौंदलगा) या विद्यार्थिनींना त्यांची शालेय वार्षिक फी, गणवेश, पाठ्यपुस्तक यासाठी येणारा वार्षिक खर्चाचीरक्कम रोख देण्यात आली.
कै. आनंदराव पाटील पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य, प्रा. सुरेश कांबळे म्हणाले, स्वतः गरीबीत जीवन जगूनही कैलासवासी अण्णाप्पा मधाळे यांनी आपल्या मुलांना आदर्श घालून दिलेला आहे, पत्रकार पांडुरंग मधाळे व राजू मधाळे यांनी आपल्या वडिलांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त गरीब, हुशार होतकरू विद्यार्थिनींना आर्थिक मदत करून जो उपक्रम राबवलेला आहे त्याचा या विद्यार्थीनींनी उपयोग करून घ्यावा. समाजात परिवर्तन घडावे, आपणही समाजाचे काही देणे आहे. हा उद्देश ठेवून, मधाळे कुटुंबीय कार्यरत आहे.
बी. एन. इंगळे म्हणाले, मधाळे कुटुंबियाकडून राबविण्यात आलेला उपक्रम स्तुत्य आहे. स्वतः गरीबी काय असते हे भोगले मधाळे गरीब, अर्थसहाय्य करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कार्यक्रमास एस. के. हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एस. जोडट्टी यांच्यासह सहाय्यक शिक्षक, पदवीपूर्व कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta