निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून निपाणी ते कोल्हापूरसह कर्नाटक राज्य सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व गावात डिग्री व डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे बस पास देणे निपाणी आगाराने बंद केले होते. हे बस पास सुरू करण्याची मागणी ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशनने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी परिवहन मंत्र्यासमवेत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे बंद झालेले बस पास सोमवारपासून (ता.९) विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.
कर्नाटक सीमा भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षण विविध प्रकारचे प्रशिक्षण व अन्य शैक्षणिक कामासाठी दररोज महाराष्ट्रातील शहरांमध्ये याचा करतात. पण अचानकपणे निपाणी आगारातर्फे या विद्यार्थ्यांना दिले जाणारे १० महिन्याचे बसपास बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज, इचलकरंजी, मिरज येथे जाण्यासाठी आर्थिक उदंड सोसावा लागत होता. त्याबाबतह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशनने राज्य परिवहन मंत्र्यांना निवेदन देऊन पास देण्याची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेऊन सदरचे बस पास सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशनतर्फे लक्ष्मण चिंगळे यांचा सत्कारही करण्यात आला. सोमवार पासून बस पास मिळणार असल्याने महाराष्ट्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालकातून समाधान व्यक्त होत आहे. चिंगळे यांच्या सत्कार प्रसंगी वकील संजय चव्हाण, अशोक लाखे, रामचंद्र निकम, अशोक खांडेकर, बाळासाहेब कमते, बबन चौगुले यांच्यासह ४ जे-आर हह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.