
निपाणी (वार्ता) : सयाजीराव गणपतराव देसाई यांच्या शेतामध्ये २५ वर्षापूर्वी लावलेल्या चंदनाच्या झाडाची शिरगुप्पी (ता. निपाणी) येथे चोरी केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सदर शेतकऱ्याने निपाणी शहर पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सयाजीराव यांच्या सर्वे क्रमांक 141/1 मधील शेतात 25 वर्षे जुने चंदनाचे झाड होते. मात्र गेल्या मंगळवार 3 ऑक्टोबरच्या पहाटे अज्ञातानी झाड कापून नेले. शेतापासून काही अंतरावरच झाडाच्या फांद्या व अन्य भाग कापत बुंधा चोरून नेला. याप्रकरणी देसाई यांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र पत्ता लागला नसल्याने त्यांनी सोमवारी निपाणी शहर पोलिसात फिर्याद नोंदवली. पाच वर्षांपूर्वीही देसाई यांच्या शेतातील झाडांची चोरी झाली होती. याप्रकरणी तक्रार नोंदवूनही पोलीस तसेच वन खात्याने कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे देसाई यांनी सांगितले. आता पुन्हा एकदा चंदन झाडाची चोरी झाल्याने देसाई यांचे सुमारे 50 हजाराचे नुकसान झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta