Monday , December 23 2024
Breaking News

निपाणी हद्दवाढीबाबत हस्तांतराची सूचना

Spread the love

 

सहा गावातील सर्वे क्रमांकाचा समावेश : तालुका पंचायतीला आदेश

निपाणी (वार्ता) : निपाणी शहराच्या परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावांचा विस्तार वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी नगरपालिकेने सन २०११ साली हद्द वाढीचा प्रस्ताव दिला होता. पण आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. अखेर निपाणी तालुका पंचायतीला हद्द वाढीसाठी परिसरातील सहा गावातील काही सर्वे क्रमांक समाविष्ट करून घेण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यामध्ये यमगरणी, कोडणी, जत्राट, यरनाळ, शिरगुप्पी आणि नांगनूर या गावातील काही सर्वे क्रमांकाचा समावेश आहे.
निपाणी नगरपालिकेने २०११ मध्ये हद्दवाढीबाबतचा ठराव करून वरिष्ठाकडे पाठवला होता. त्यानुसार वरीलपैकी अनेक गावांमध्ये नगरपालिका प्रशासनातर्फे पाणीपुरवठा व इतर सुविधा दिल्या आहेत. पण गावातील महसूल बुडणार असल्याचा भीतीपोटी या हद्दवाढीसाठी संबंधित गावातील ग्रामपंचायती तयार नव्हत्या. तरीही हद्दवाढी बाबत नगरपालिका प्रशासनाने पुन्हा याबाबत पत्र पाठवून पाठपुरावा केला होता. त्यानुसार हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रत्यक्षात संपूर्ण गावेच नगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट होणार नसून प्रत्येक गावातील केवळ आठ ते दहा मालमत्तेचे सर्वे क्रमांक समाविष्ट होणार आहेत. समाविष्ट करण्याची प्रक्रिया आठवड्याभरात सुरू करण्याची सूचनाही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
हद्दवाडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावातील तलाठी पातळीवरील सर्व कामे निपाणीत होणार आहेत. शिवाय या सर्व क्रमांकासाठी निपाणी नगरपालिकेतर्फे सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तर संबंधित मालमत्तेचे कर नगर पालिके कडेच भरावे लागणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्यामानाने या क्रमांकामधील नागरिकांना सुविधाही द्याव्या लागणार आहेत.
——————————————————————-
‘हद्दवाढी बाबत आपण २०११ मध्ये प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये सहा गावातील काही सर्वे क्रमांकाचा समावेश आहे. त्याची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा स्मरणपत्र दिले आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.’
जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
——————————————————————-
निपाणी नगरपालिकेला वर्ग होणारे सर्व्हे क्रमांक ग्रामपंचायतीचे नाव सर्व्हे क्रमांक : यरनाळ : १३, १४,१८, १९, २०, २१, २२, २३, २९, ३० आणि ३१.

कोडणी: ९५, १२१, १७२, १७३, १७७, १७९,१८०, १८१, १८२, १८५, १८६, १८८, १८९, १९० १९४, १९५, १९६, १९७, १९८ आणि १९९.

यमगर्णी : ७२, ७३, ७४, ७५, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५, ८६, ८८, ८९, ९०, ९१, ९२ आणि ९३.

नांगनूर : १५, १६, २५, २६, २९, ३१, ३२ आणि ३६.

जत्राट : २३२, २३४, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २६० आणि २६१.

About Belgaum Varta

Check Also

नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक

Spread the love  जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *