बोरगावच्या इकबाल चाच्याची कहाणी; जनमानसाचा डोळ्यात आले पाणी
निपाणी (वार्ता) : बोरगाव (ता.निपाणी) येथे गेल्या अनेक वर्षापासून पोटाची उपासमार होणाऱ्या आणि वयाची साठी पूर्ण झालेल्या दुर्दैवी बाबाला अखेर मुलगा परदेशात असतानाही अनाथ आश्रमात जावे लागणे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.
ही कथा आहे बोरगावच्या दुर्दैवी इकबाल हैदर जमादार चाच्याची.
बोरगाव (ता.निपाणी) येथे कोल्हापूर येथील इकबाल हैदर जमादार हा ६१ वर्षीय वयोवृद्ध गेल्या २५ वर्षापासून वास्तव्यास आहे. त्यांच्या मागे ना पत्नी, ना मुले कोणताही जवळचा परिवार, नसताना, आज या घरात! तर उद्या त्या घरात मागून पोटाची खळगी भरत आयुष्याचा शेवटचा प्रवास सुरू आहे. इकबाल चाच्या निवारासाठी कधी दर्गा, कधी चावडी, कधी मंदिर तर कधी सार्वजनिक ठिकाणी विसावा घेत आहे.
वयाची साठी ओलांडल्यानंतर ना घरच्यांनी पाहिले, ना बाहेरच्यांनी पाहिले, अशी अवस्था असलेला इकबाल चाच्या आपल्या शारीरिक व्याधीने त्रस्त होतांना दिसला. त्यामुळे येथील समाजसेवक तुषार कांबळे यांनी पुढाकार घेत त्यांना मत्तीवडे येथील अनाथ आश्रमात पाठवले. पण दुर्दैव इतकेच की स्वतःचा मुलगा परदेशात असताना देखील वडिलांना मात्र वृद्धाश्रमाची वाट धरावी लागणे ही दुर्दैवीच गोष्ट म्हणावी लागेल.
या वयोवृध्द इसमाची बोरगावच्या कस्वा बैतूलमाल एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांच्या पुढाकाराने मत्तीवडे येथील देवांश मनुष्य समाजसेवा अनाथ आश्रम या ठिकाणी सदर वयोवृद्ध व्यक्तीस पाठवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. बोरगाव येथील कस्वा बैतूनमाल एज्युकेशन व वेलफेअर सोसायटी संघ यांनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. इकबाल चाचाची परिस्थिती खालावाल्याने स्वतः जवाबदारी धेऊन शियाय त्याला जीवनावश्यक किट देऊन मत्तीवडे आश्रमात सुपूर्द करण्यात आले. यावेळी कमिटीच्या वतीने नवाझ कापसे, जमीर मानगावे, आयुब मकानदार, हसन मुजावर, यासीन मकानदार, सद्दाम मकानदार, समीर चिकोडे, शब्बीर नदाफ अस्लम दुधगावे खाजा मकानदार, अमन कापसे, अरमान जाह, तांझिम जमादार, मुनीर मांजरेकर, तैमुर मुजावर, जावेद मकानदार उपस्थित होते.