निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागातील शाळा परिसरामध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट विक्री केली जात आहे. त्याचा विद्यार्थ्यावर परिणाम होत असून शाळा परिसरातील ही विक्री थांबविण्याचा मागणीचे निवेदन ४ जे आर ह्यूमन राईट केअर ऑर्गनायझेशन संघटनेतर्फे शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्ताकडे दिले होते. त्या तक्रारीची दखल घेऊन येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला याबाबत ताबडतोब कार्यवाही करण्याचे सूचना करणारे पत्र देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अशोक खांडेकर यांनी दिली.
शाळा परिसरात होणारी तंबाखू आणि गुटख्याची विक्रीची माहिती घेऊनह्यूमन राईट केअर ऑर्गनायझेशन संघटनेने त्याबाबत शिक्षण खात्याच्या वरिष्ठाकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्याची तात्काळ दाखल घेऊन सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेने परिसरात सिगारेट, तंबाखू, गुटखा विक्रीला तात्काळ आला घालावा. याशिवाय उत्तम दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यची सूचना पत्राद्वारे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला केली आहे. या पत्राची प्रत शिक्षण खात्याकडून संघटनेलाही देण्यात आले आहे.
शिक्षण खात्याने घेतलेल्या निर्णयाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तरी या सूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी प्रशांत पाटील, राहुल ताडे, ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन पवार, अशोक खांडेकर, निखिल चिंचणकर, सचिन परीट, सुशांत अमाते, सागर सांडगे, अतुल पारळे, युवराज शेटके, अनिल पाटील, विद्याश्री फुटाणे, प्रनोती निंबाळकर, वर्षा पवार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.