निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवानिमित्त शहरात काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध घोषणांनी शहर शिवमय होत आहे.
सोमवारी (ता.१६) प्रथम शिवाजी महाराज मूर्तिचे पूजन श्रीमंत राजेशराजे देसाई निपाणकर -सरकार व ध्वज आणि शस्त्र पूजन संजय पंगिरे यांच्या हस्ते झाले. ध्येय मंत्राने दुर्गामाता दौडीस सुरवात झाली. प्रथमता जगदंबेची आरती करून तेथून दुर्गामाता दौड निपाणकर राजवाड्याकडे मार्गस्थ झाली.
ही दुर्गामाता दौड शिंत्रे कॉलनीत स्वागत करण्यात आले. शिंत्रे कॉलनी, हारीनगर, मंगळवार पेठ परिसरात स्वागत करण्यात आले. यावेळी परिसर शिव जयघोषणे दुमदूमून गेला होता. मंगळवार पेठ मधील श्री महादेव मंदिरात आरती करून श्री दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मार्गस्थ झाली. प्रेरणा मंत्राने दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी विनायक चांगभले, सिधु माळी, तुषार माळी, चोरगे आण्णा, विकास नवले सर, रमेश बेळगले, किरण मैशाळे, प्रकाश माने, गणेश बेळगळे, रवी देशमुख, मृणाल कुरबेट्टी, इंद्रजित बगाडे, अंकुर कुरबेट्टी, साहिल कांबळे व मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते व शिवशंभू भक्त उपस्थित होते.
————————————————————–
आकर्षक रांगोळ्या
सोमवारी काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्या मार्गावर नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. ठीक ठिकाणी आरती करण्यासह पुष्पवृष्टी करण्यात आली.