निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्या काळात २०१९-२० आणि २०२१-२२ सालात कुन्नूर येथील अनेक घरांची पडझड झाली होती. त्याचे सर्वेक्षण झाल्यानंतर नुकसानग्रस्त घरासाठी लाभार्थी ठरले होते. पण मोजक्याच नागरिकांना घरे मंजूर झाली. पात्र असूनही बऱ्याच लोकांना मदत न मिळाल्यामुळे कुन्नूर येथील लाभार्थ्यांनी ग्राम पंचायत समोर उपोषण केले. कुन्नूर येथील लाभार्त्यांची दखल घेत तालुका पंचायत अधिकारी रविकुमार हुक्केरी यांनी लाभार्त्यांना एका महिन्याच्या आत देण्याची लेखी ग्वाही देण्यात आली. या कामी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा लाभार्थी व ग्रामपंचायत सदस्यातर्फे सत्कार करण्यात आला.
कुन्नूर येथील पूरग्रस्त लोकांच्या व ग्रामस्थाच्या पाठीमागे खंबीर राहून महत्वाची भूमिका बजावून माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी मदत केली. त्याबद्दल कुन्नूर येथील लाभार्थी व ग्रामस्थानी काँग्रेस कार्यालयात भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष अजित जाधव, सुभाषराव पाटील, बाळासो करडे, जैनुल सनदी, जितेंद्र चेंडके, रामचंद्र करडे, भारत करडे, आर. वाय. पाटील, वरुण कुलकर्णी, शिवाजी निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.