Share
कोगनोळी : श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे दिनांक 28 पासून सुरू होणाऱ्या श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त हालसिद्धनाथ मंदिर व परिसर गाड्या पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून लाखो भाविक देवदर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करून भाविकांच्या गाड्या, दुकाने, पाळणे इत्यादी जागेची व्यवस्था करून देण्यासाठी जागेची स्वच्छता यात्रा कमिटी व ग्रामपंचायततर्फे करण्यात येत आहे. भाविकांना यात्रा काळामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये व व्यवस्थितपणे दर्शन करण्यात यावे तसेच यात्रा काळामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ठीक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे.
बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मुख्य रस्त्यावरील असलेल्या अडचणी दूर करून रस्ते स्वच्छ करण्यात येत आहे.
यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष ए जी माने, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण आबने, बी एस बोते, ग्राम पंचायत सदस्य किसन पोटले, सिद्धेश्वर गवंडी, शहाजी माने, आनंदा कुवाळे, शाहू जाधव, बाळासाहेब गारगोटे, रणजीत माने, सयाजी माने यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले आहे.

Post Views:
507