गुर्लापूरचा संघ उपविजेता; कर्नाटक – महाराष्ट्रातील २२ संघाचा सहभाग
निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड येथील आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात चांदपीर वालुग मंडळातर्फे आंतरराज्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये हेरवाडचा संतुबाई वालुग मंडळ विजेता ठरला.
धनगर समाजाचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल बन्ने यांच्या अध्यक्षतेखाली तर मनोज मगदूम, अजित पाटील, महादेव पुजारी, माहीर पाटील, गजानन लोकरे, चंद्रकांत लोकरे, फायजान मुजावर यांच्या प्रमुख उपस्थित या स्पर्धा पार पडल्या. कृष्णा आरगे यांनी स्वागत केले. पद्मराज पाटील, रावसाहेब कांबळे, श्रीकांत नरुटे यांच्या हस्ते मैदान पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले.
संतुबाई मंडळाने २ मिनिट २५ सेकंदात रुपया पाडून पहिल्या क्रमांकाचे ११ हजार १ रुपये व चांदीची गदा पटकाविली. तर जय हनुमान वालुग मंडळ -गुर्लापूर यांनी २ मिनिट ३० सेकंदात विजय खेचून ७ हजार १ रुपये व चांदीचा गदा मिळवून दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तर घोडगेरी सिद्ध वालुग मंडळ -तळंदगे यांनी २ मिनिट ३३ सेकंदात मैदान मारून ५ हजार १ व चांदीची गदा पटकाविले. चौथा क्रमांकाचे ३००१ व ५ फुटी ढाल लक्ष्मी वालुग मंडळ ढोणेवाडी (ए) व पाचवा क्रमांकाचे २००१ व ५ फुटी ढाल हे बक्षीस गैबी हालसिद्धनाथ वालुग मंडळ कुरुंदवाडने मिळविले. श स्पर्धे कर्नाटक व महाराष्ट्रातील २२ संघानी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळीमायाप्पा बन्ने, कऱ्याप्पा बन्ने, संजय बन्ने, कृष्णा बन्ने, गणेश बन्ने, युवराज महिपती, श्रीशांत महिपती, राजू बन्ने, नागेश बन्ने, मुरारी बन्ने, कृष्णा बन्ने, देवराम महिपती, मायाप्पा बन्ने, सागर बन्ने, स्वप्नील बन्ने, यांच्यासह चांद पीर वालुग मंडळाचे सदस्य उपस्थित होते.