
राजू पोवार; कार्यालयाला ठोकणार टाळे
निपाणी (वार्ता) : वीजपुरवठ्याअभावी उसासह इतर पिके इतर वाळू लागली आहेत. याशिवाय शॉर्टसर्किटमुळे उसासह इतर पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे दहा तास वीज पुरवठा करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी, या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी नुकसान भरपाई देण्यासह सुरळीत वीज पुरवठ्याचे आश्वासन मिळाले होते. पण त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता पुन्हा एकदा शुक्रवारी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. सोमवारी (ता.२३) सकाळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, पावसाअभावी विहिरी आणि कुपनलिकेच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होऊन उत्पादनात मोठी घट झाली. तसेच शॉर्टसर्किटने बेनाडी, यमगर्णी, कोगनोळी, जैनवाडी मानकापूर परिसरातील ऊसाला आग लागून नुकसानीचे पंचनामेही झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायत पासून जिल्हा अधिकारी आणि मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदने देऊनही आज तागायत कोणतीच भरपाई मिळालेली नाही.
शेतीवाडीतील विद्युत खांबाच्या वाहिन्या लोंबकळत असून अनेक ठिकाणी उघड्यावरील फ्युज पेट्यामुळे शेतकऱ्यांनाही धोका होत आहे. त्यांची आजतागायत दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांची सहनशीलता संपलेली असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या अनेक कागदावरच असून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेतीसाठी दिवसा विना खंडित दहा तास वीजपुरवठा करण्यासह करण्यासह शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन आंदोलन छेडले जाणार आहे. त्यासाठी निपाणी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.२७) सकाळी ८ येथील शासकीय विश्रामधामावर एकत्रित जमून हुबळी येथील इस्कॉन वरील मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही पोवार यांनी केले.
यावेळी सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, कुमार पाटील, नामदेव साळुंखे, सागर पाटील, रोहन नलवडे, मयूर पोवार, दादासाहेब चौगुले सचिन कांबळे, रवी तावदारे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta