
कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती : फकीरांना बिदागीचे वितरण
निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमीत्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची रवानगी रविवारी (ता.२९) परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करून करण्यात आली.

यावेळी उरूस कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब सरकार यांनी, सर्वांच्या सहकार्याने ऊरूस उत्सव शांततेत सुरू आहे.मानाच्या फकीरांनी आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली असून ऊरूस कमिटीनेही त्यांचा यथोचित मान – पान केलेला आहे. आगामी काळात ही परंपरा वाढीस लागण्यासाठी फकीर संप्रदायाने सहकार्य करून निपाणी व परिसरात धार्मिक सौहार्द, शांतता, एकोपा, सुख, समृध्दी कायमपणे रहावी, यासाठीप्रार्थना करण्याचे आवाहन केले.
यावेळी मानाच्या फकीरांच्या वतीने सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक असलेल्या संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित दर्गाहची ऊरूस परंपरा अखंडीतपणे सुरू रहावे. सर्व मानकऱ्यांसह येथे येणाऱ्या सर्व भाविकांमध्ये बंधुत्व कायम रहावा, सुख, समृध्दी यावी, अशी प्रार्थना केली.
यावेळी रमेश देसाई -सरकार, पृथ्वीराज चव्हाण, संग्रामसिंह देसाई-सरकार सरकार, रणजितसिंह देसाई -सरकार, राजूबाबा निपाणीकर, संजय माने, विवेक मोकाशी, शरद मळगे, बाळू पोतदार, अजित भोकरे, बंडा गंथडे, बाबासाहेब सुतार, सनी साळुंखे, संतोष गंथडे, प्रभाकर पाटील, जयराम मिरजकर, अतिश सुतार, सदाशिव डवरी, संभाजी मुगळे, प्रवीण हेगडे, शीतल बुडके, सचिन पावले, सागर हरेल, राजू बुवा, शामराव कांबळे, संजय सुतार, चिराग अली शा बनवा सरगुरु, शोबोदिन अली, बनवा कुडची, सरगुरु, समीर अली, करोशी सरगुरु, शब्बीर भंडारी, यासीन अली, जलाली निशानबरदार, गुलजार अली, मलंग सरगुरु, हसन अली खलिफा, मुराद अलीशा खलिफा, अकबर अलीशा चिंचणी यांच्यासह मानाचे अनेक फकीर उपस्थित होते.
—————————————————————–
भाविकांची गर्दी
तुरबत दर्शनाकरीता रविवारी (ता.२९) भाविकांची मोठ्या प्रमाणात रीघ लागली होती. दर्गाह परिसरापासून जुना मोटार स्टॅण्ड पर्यंत विविध व्यावसायिकांनी थाटलेल्यादुकानांमध्ये खरेदी करीता नागरीकांनी गर्दी केली होती. दर्गाह मंडपसमोर लागलेल्या अब्दुल कुन्नूरे, शानूर कुन्नूरे यांच्या उंचच उंच पाळण्यामध्ये बसण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta