Monday , December 8 2025
Breaking News

पाकाळणी कार्यक्रमाने निपाणी उरुसाची सांगता

Spread the love

 

चव्हाण वारसासह मानकऱ्यांकडून नैवेद्य :१५ दिवस चालणार कंदुरीचा कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरुसाला गुरुवारी (ता.२५) पासून सुरूवात झाली होती.
शुक्रवारी (ता.२६) संदल बेडीवाल्यांच्या भर उरूस झाला. शाळा उरूस झाल्यावर मानाच्या फकीरांची रवानगी करून चव्हाण वाड्यात चव्हाण वारस व मानकरी ऊरुस कमिटी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.३१) पाकळणी कार्यक्रम करून निपाणी उरुसाची सांगता करण्यात आली.
श्री संतबाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिराणेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसा निमित्ताने चव्हाण वारसातर्फे संग्रामसिंह देसाई, रणजितसिंह देसाई, सरकार पृथ्वीराज, चव्हाण व समस्त साळी समाज यांच्या हस्ते लवाजमा मानकरी यांच्या उपस्थितीत दर्ग्यास अभिषेक, बाहेरील, चव्हाण वाड्यातील समाधीस अभिषेक घालून दर्गा धुवून पाकाळणी विधी पार पडला. गोडा नैवेद्य, प्रसाद व मानकरी यांच्या रवानगीने उरुसाची सांगता झाली.
उरूसानिमित्त बैलगाडी शर्यती, घोडा बैलगाडी शर्यती, घोडा गाडी शर्यती, कव्वालीचे जुगलबंदी, कुस्ती मैदान पार पडले. नैवेद्य अर्पण व दर्शनासाठी दर्गा परिसरात भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. रविवारी मानाच्या फकीरांची रवानगी करून चव्हाण वारसाच्या हस्ते भंडारखाण्याचे साहित्य सुपूर्द केले.
पाकाळणी कार्यक्रमास बाबासाहेब उर्फ रमेश देसाई सरकार, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, सुजय देसाई सरकार, संग्रामसिंह देसाई- सरकार, रणजीतसिंह देसाई सरकार, राजूबाबा निपाणीकर, संजय माने, विवेक मोकाशी, शरद मळगे, बाळू पोतदार, अजित भोकरे, बंडा गंथडे, बाबासाहेब सुतार, सनी साळुंखे, अतिश सुतार, संतोष गंथडे, प्रभाकर पाटील, जयराम मिरजकर, सदाशिव डवरी, यांच्यासह मानकरी नागरिक उपस्थित होते.
अनेक वर्षांची परंपरा असलेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हा उत्सव शांततेत पार पडला. उरूस काळात चिकोडीचे उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार आणि सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *