मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा : झाल्या मतदानाचा हिशोब सुरू
निपाणी (विनायक पाटील) : बेळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बोरगाव नगरपंचायतीची 17 प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशी लढत झाली. नगरपंचायतीची ही निवडणूक असल्याने प्रत्येक उमेदवारांना आपणच नगरसेवक होणार असल्याचे निकालापूर्वी स्वप्न पडू लागली आहेत. झालेल्या मतदानाची आकडेवारीचा हिशोब उमेदवार करत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी(ता.30) निपाणी येथे या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्याने महिला उमेदवारांना लक्ष्मी पावणार का याबद्दलही चर्चेला ऊत आला आहे.
बोरगाव येथील नगरपंचायत निवडणूक झाल्यामुळे सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत पाहावयास मिळाली. मतदान झाल्यानंतर सर्वच पक्षाने आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक लढवलेल्या उमेदवारात उत्साहाचे वातावरण आहे. निवडणुकीनंतर हे उमेदवार झालेल्या मतदानाचे गणित जुळवत असून आपलाच विजय निश्चित असल्याचे मानत आहे. गुरुवारी सर्वच सतरा प्रभागाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार आपणच निवडून येणार असल्याचे दावे करत आहेत. मतदानानंतर निकाल 3 दिवस लांबल्याने उमेदवारांना मात्र आपणच नगरसेवक असल्याचे स्वप्न पडत आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांनी सर्वच उमेदवारांना तुम्हालाच मतदान करू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे मतदारांच्या प्रतिसादामुळे उमेदवाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक प्रभागात मतदानाचा टक्केवारी चांगली राहिल्याने सर्वच पक्षाचे संबंधित उमेदवार या मतदानाचा फायदा आपल्याच होणार असल्याचे बोलत आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांना नेहमी विचारपूस करणारे उमेदवार आता दुर्लक्ष करत असल्याचेही दिसत आहेत. निवडणूक काळात सर्वच हॉटेलमध्ये गर्दी दिसून येत होती. निवडणूक संपताच गर्दी कमी झालेली आहे. अनेक उमेदवारांनी निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात उधारीवर व्यवहार केले. निवडणूक होताच उमेदवारांना पैशाची मागणी होत असल्याचेही दिसत आहे. निकाल लागण्यापूर्वी उधारी वसुली करण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत आहेत.
—
उमेदवारांना निकालाची चिंता
जन जन… की सुनो झंकार.. ये दुनिया है काला बाजार, के पैसा बोलता है… या गीताला साजेसे काहीसे चित्र बोरगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत दिसून आले. 17 प्रभागामधील मतदारांमध्ये मतदानाचे दिवशी एकच चर्चा होती. ती म्हणजे कोणत्या पार्टीने किती वाटले. यावरून भविष्यातील कोणतीही निवडणूक आता सामान्य माणसाच्या हातची नाही, हे स्पष्ट झाले. गावाच्या विकासात महत्वाची भूमिका असणार्या निवडणूक प्रक्रियेत लाखोचा धुराळा उडाल्यावरून स्पष्ट होत आहे. लाखोंचा खर्च केल्यावर आता उमेदवारांना प्रत्यक्ष निकालाची चिंता लागली आहे.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …