धार्मिक कार्यक्रमासह शर्यतीचे आयोजन
निपाणी (वार्ता) : आडी येथील सिद्ध संस्थान मठातील श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त, शुक्रवार (ता.२४) ते मंगळवार (ता.२८) पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे यंदा १५१ वे वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती होणार आहेत.
शुक्रवारी (ता.२४) पूजा व भजन सेवा, शनिवारी (ता.२५) श्री सिद्धेश्वरदेवाचा अभिषेक व रात्री भजनसेवा, रविवारी (ता.२६) श्री सिद्धेश्वर देवाचा दुसरा अभिषेक व रात्री भजन होणार आहे. सोमवारी (ता.२७) सकाळी १० वाजता सांगली येथील सिद्धनाथ बँड वागणामध्ये आंबील घागरी मिरवणूक, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री ९वाजता श्री गणेश मिरवणूक व विसर्जन समारंभ होणार आहे. मंगळवारी (ता.२८) सकाळी ११ वाजता विना विसर्जन व निपाणी मधील फुटाणे बंधूंचा महाप्रसाद व बिदागी कार्यक्रम होणार आहे.
रविवार (ता.२६) सकाळी ९ वाजता विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.
दुबैल गाडी शर्यती ब गटासाठी बक्षिसे अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, १० हजार, ५ हजार व ३ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. बिन दाती घोडा-बैल गाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, १ हजार व ५०० रुपये. घोडेस्वार शर्यतीसाठी अनुक्रमे १५०० रुपये, १ हजार रुपये, ७ रुपये. जनरल घोडा -बैल – शर्यतीसाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार,१ हजार रुपये. घोडागाडी ब, गट शर्यतीसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, १ हजार, ५०० रुपये अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
सोमवारी (ता.२७) दुपारी ३ वाजता स्लो – मोटरसायकल स्पर्धेसाठी अनुक्रमे, १ हजार, ७०० आणि ५०० रुपये बक्षीस दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी शर्यती संयोजकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.