संजय आवटे, अनंत राऊत प्रमुख वक्ते
निपाणी (वार्ता) : निपाणी हे परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र आहे. येथे समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी शेतकरी, कामगार, कष्टकरी, शोषित व वंचितांच्या न्याय हक्कासाठी चळवळी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच समतेची विचारधारा तळागाळात पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. म्हणूनच सामान्य माणूस जात, धर्म, पंथ भाषा या पलीकडे जाऊन स्वाभिमान व सन्मानाने जगत आहे. ही समतेची चळवळ गतिमान व्हावी, या उद्देशाने रविवारी (ता. २४) सकाळी १० वाजता अक्कोळ क्रॉस येथील राजा शिव छत्रपती सांस्कृतिक भवनात फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन संमेलन आयोजित केल्याची माहिती डॉ. आंबेडकर विचार मंचचे संस्थापक प्रा. सुरेश कांबळे यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रा. कांबळे म्हणाले, सद्यस्थितीत तरुणांना वैचारिक मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशा द्यावी. परिवर्तनवादी चळवळ जिवंत ठेवून सर्व जाती-धर्माच्या माणसात स्नेह, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय ऐक्य साध्य व्हावे. या हेतूने निपाणी परिसरात डॉ. आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून गेली २७ वर्ष सातत्याने ‘शिवराय ते भीमराय’ या महापुरुषांना प्रमाण मानून सर्वसमावेशक अशा विविध संमेलनातून समतेचा संदेश देण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जेष्ठ विचारवंत संजय आवटे व सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. ‘बुध्द, बसव, आंबेडकर ते विद्रोही तुकाराम!, दाष्य मुक्तीचा धगधगता इतिहास’ या विषयावर वैचारिक जागर होणार आहे.
बैठकीस बैठकीला दीपक शेवाळे, कमलाकर राबते, संदीप माने, कैलास ढाले, करण कांबळे, प्रवीण माने, अविनाश माने, राजू कांबळे, अमित शिंदे, पिंटू माने, राहुल भोसले, अशोक लाखे, गणू गोसावी, प्रवीण सौंदलगे, अजिंक्य कांबळे, दादासो कांबळे, किसन दावणे, सचिन भिवसे, संतोष कांबळे, जितेंद्र कांबळे, साजन घस्ते, प्रतीक मधाळे, संजय कांबळे, शक्ती कांबळे, संदीप कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.