अध्यक्ष आकाश माने; निपाणी येथे बैठक
निपाणी (वार्ता) : प्रतिवर्षी निपाणी तालुक्यातील शिवप्रेमींना गडकोट मोहीम घडवणाऱ्या मावळा ग्रुपची यंदाची मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर होणार आहे. या मोहिमेची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी सांगितले. मावळा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक मावळा ग्रुपच्या कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यंदाच्या मोहिमेबद्दल व अन्य विषयांवर चर्चा झाली.
मावळा ग्रुप प्रतिवर्षी निपाणी तालुक्यातील शिवप्रेमींसाठी गडकोट मोहीम आयोजित करत असतो. यापूर्वी रायगड व राजगड मोहीम ग्रुपने केल्या आहेत. निपाणी तालुक्यातील सुमारे ८०० पेक्षा जास्त मावळ्यांना गडदर्शन घडविले आहे. मोहिमेमध्ये शिवप्रेमींच्या राहण्याचा जेवणाचा पोषाखाचा खर्च हा मावळा ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे. शिवनेरी मोहीम निश्चीत झाली असून लवकरच याची तारीख जाहीर करू, असे आकाश माने यांनी सांगीतले. खजिनदार राहुल सडोलकर -भाटले, संचालक शांतिनाथ मुदकुडे, सल्लागार उदय शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. बैठकीस ग्रुपचे उपाध्यक्ष महादेव चव्हाण, सल्लागार संजय चिकोडे, संचालक अनिल चौगुले, दादा जनवाडे, सुशांत कांबळे, पृथ्वीराज घोरपडे, राहुल पाटील, राहुल निंबाळकर, मंगेश लठे, संजय जंगी, सागर पाटील, उमेश गंथडे, विशाल बुडके यांच्यासह संचालक पदाधिकारी उपस्थित होते.