निपाणी : दादरच्या चैत्यभूमीवरील जनसमुदाय पाहता मानवी जीवन मूल्याची प्रेरणा मिळण्याची स्थान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी होय, असे प्रतिपादन आडी येथील तक्षशील बुद्ध विहारांमध्ये आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानात मिथुन मधाळे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक रत्नाप्पा वराळे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर आडी येथील बुद्ध विहाराचे शिल्पकार कैलासवासी मधुकर शेवाळे व कैलासवासी एन. के. वराळे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी कांबळे यांनी केले. यावेळी बाबासाहेब वरळे, राहुल भोसले, सुरेश भोसले यांनी दीप प्रज्वलन केले.
रोहन कांबळे या विद्यार्थ्यांने डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांचे जीवन चरित्र आपल्या भाषणातून सांगितले.. तर पुढे मिथुन मधाळे म्हणाले 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे देशाची सर्वात मोठी हाणी झाली. देशातील राजघटनेची महत्त्वाची कामगिरी त्यांनी पार पडली होती. हा दादरच्या चैत्यभूमीवर जो जनसमुदाय आपणास पाहायला मिळतो तेथे होणारे वेगवेगळे प्रबोधन कार्यक्रम, पुस्तकांचे स्टॉल, या माध्यमातून जीवनाची प्रेरणा घेऊन लोक तेथून जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्त्वाचा अवलंब करून आपण समाजाची पर्यायाने बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तर युवक आणि व्यसनापासून दूर राहून बाबासाहेबांचे उपकार परत फेडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी या कार्यक्रमास सुरेश भोसले, स्वरूप घाटगे, कुलदीप भोसले, युवराज वराळे, योगेश शेवाळे, विश्वराज वराळे ,रोहन कांबळे, हृतिक वराळे, दादू भोसलेहे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भोसले यांनी केले तर आभार कृष्णात शेवाळे यांनी मानले.