अभियंते श्रीकांत मकाणी यांची भेट
निपाणी (वार्ता) : शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी नवीन तलाव निर्मितीच्या कामासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व लघु पाटबंधारे मंत्री एम. एस. भोसराज यांची बेळगांव विधानभवनात भेट घेतली. प्रशासनाने या कामास सकारात्मक प्रतिसाद देत तलाव निर्मीर्तीच्या जागेचा सर्व्हे करण्याचा २४ तासात आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता.१४) लघु पाटबंधारे खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंते श्रीकांत मकाणी यांनी जागेची पहाणी करून तलाव निर्मीर्तीला योग्य जागा आहे. शासनाकडून याबाबत अहवाल तयार करण्यासाठी गती दिली जाईल असे सांगितले.
याबाबत माहिती देताना माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, लक्ष्मणराव चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व लघु पाटबंधारे मंत्री एम. एस. भोसराज यांची बेळगांव विधानभवनात भेट घेतली. निपाणी शहराच्या कायमस्वरूपी पाणी प्रश्नासाठी नवीन तलावासाठी १७५ कोटी खर्चाचा प्रस्ताव सादर केला. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व लघु पाटबंधारे मंत्री एम. एस. भोसराज यांनी या नवीन तलावाच्या जमीनीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले. त्यामुळे गुरुवारी वरील जागेचा सर्वे करण्यात आला. यावेळी बोलताना अभियंते म्हणाले, निपाणी शहरातील भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नव्या तलाव निर्मितीची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री महोदयांनी सर्वेचा आदेश दिला होता. सदरची जागा तलावासाठी योग्य असून पुढील कामकाज लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यरनाळ ओढ्याजवळ लहान डॅम बांधण्यात येणार आहे.या कामात कोणतीही अडचण भासणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.
यावेळी एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देवून सदर कामाचा अहवाल बनवून देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे या कामाला गती मिळणार असून निपाणीच्या नवीन तलावाचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊन शहर व उपनगरातील नागरिकांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी नगरसेवक रविंद्र शिंदे, बाळासाहेब देसाई- सरकार, शौकत मणेर, दत्तात्रय नाईक, डॉ. जसराज गिरे. संजय पावले, शेरू बडेघर, अनिता पठाडे, अनिस मुल्ला, सुनील शेलार, दिपक सावंत, विशाल गिरी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta