तयारी पूर्णत्वाकडे ; निपाणी परिसरात उत्सुकता शिगेला
निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एच जे सी सी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) होत आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण डॉ. सुभाष आठल्ये हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात निकोप समाज निर्मितीसाठी विज्ञान जागृती करण्याच्या हेतूने या संमेलनात विविध वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारे उपक्रम आयोजित केले आहेत. या वर्षी पर्यावरण जागृकता, प्रायोगिक विज्ञान व प्रात्यक्षिक कौशल्य, ‘आम्ही असे घडलो’ प्रकट मुलाखत, अंधश्रद्धा निर्मूलन प्रयोगिक कार्यक्रम, उमंग सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी व विज्ञान प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य सैनिक मारुती माने यांचे स्मरणार्थ शनिवारी (ता.१६) विज्ञान आकृती रांगोळी स्पर्धा पार पडल्या.
यावेळी समितीचे संचालक कुमार माळी, एस. एस. चौगुले, ए. ए. चौगुले, टी एम यादव, डी. एस. शेवाळे, एस. एम. नदाफ, एस. के. पोटले, एस. व्ही. यादव, अमोल आवटे, आनंदा ढगे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta