Thursday , March 5 2026
Breaking News

पत्रकार राजेंद्र हजारे यांची राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी निवड

Spread the love

 

कोल्हापूर (वार्ता) : निपाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची “आढावा महाराष्ट्राचा, गौरव महाराष्ट्राचा”तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र मुख्य संपादक अनिल सुतार यांनी पाठवले आहे. बुधवारी (ता.३) कोल्हापूर येथील दसरा चौकातील शाहू स्मारक सभागृहात दुपारी २ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पत्रकार राजेंद्र हजारे यांनी गेल्या २० वर्षामध्ये राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
कोल्हापूर उत्तर विभागाचे आमदार जयश्री जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, कोल्हापूर जिल्हा गृह उपाधिक्षिका प्रिया पाटील, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण सातारा विभागाच्या उप अधीक्षिका वैष्णवी पाटील, कोल्हापूर शहर काँग्रेस (आय) अनुसूचित जाती अध्यक्ष दुर्वास कदम, कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी विठ्ठल पाटील, शिवाजीराव सुतार, मंदार परितकर, बळवंत पाटील, किरण मस्कर, अमोल गावडे, संभाजी सुतार, प्रकाश मेंगाने, अनिल सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *