निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची ‘आढावा महाराष्ट्राचा’ गौरव महाराष्ट्राचा तर्फे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली होती. बुधवारी (ता.३) कोल्हापूर दसरा चौकातील शाहू स्मारकमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना कोल्हापूरच्या आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर जिल्हा गृह उपाधिक्षिका प्रिया पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकार राजेंद्र हजारे यांनी गेल्या २० वर्षामध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूर उत्तर विभागाचे आमदार जयश्री जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री आदिती देवर्षी, कोल्हापूर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण सातारा विभागाच्या उप अधीक्षिका वैष्णवी पाटील, कोल्हापूर शहर काँग्रेस (आय) अनुसूचित जाती अध्यक्ष दुर्वास कदम, कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील, विठ्ठल पाटील, शिवाजीराव सुतार, युवराज निकम, उत्तम पाटील, मंदार परितकर, बळवंत पाटील, किरण मस्कर, अमोल गावडे, संभाजी सुतार, प्रकाश मेंगाने, अनिल सुतार, इम्रान मकानदार, अविनाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.