Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार हे हिंदुत्व विरोधी : डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार हे हिंदुत्व विरोधी आहे. अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापनेचे काम जोरदार होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अकारण जुने खटले उकरून काढून गुन्हे दाखल करण्याचे काम काँग्रेस सरकारने सुरू केले आहे. हे अत्यंत दुर्दैवी क अन्यायकारक आहे, असा आरोप भाजप बेळगाव जिल्हा महिला ग्रामीण विभागाच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे.
बुधवारी काँग्रेस सरकारच्या विरोधात बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच भाजपच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अन्यायकारक परिस्थिती निर्माण केली जात आहे. हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही. कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. हे सरकार हिंदुत्व विरोधी कारवाया करू लागले आहे. राम जन्मभूमीत राम मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्व जपणाऱ्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
त्यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *