Tuesday , December 9 2025
Breaking News

सूर्य, चंद्र असेपर्यंत आर्ष परंपरा कायम राहणार : स्वस्ति जिनसेन भट्टारक महास्वामी

Spread the love

 

बोरगाव येथे देवी मूर्ती प्रतिष्ठापना

निपाणी (वार्ता) : प्राचीन काळापासून जैन धर्मात देवी, देवता यक्ष्य,यक्षणी यांना मोठे स्थान आहे. जिनेन्द्र भगवंतांच्या समोवशरणामध्ये देवींना पूजा व अलंकाराचे स्थान आहे. चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांनी संपूर्ण भारतभर फिरून जैन धर्मा मधील मुनी परंपरा दाखवली. प्राचीन काळापासून इतिहास असलेल्या जिनधर्म अबाधित राहणार असून सूर्य, चंद्र असेपर्यंत आर्ष परंपरा कायम राहणार असल्याचे मत नांदणी येथील जैन मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामींनी व्यक्त केले.बोरगाव येथील श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे श्री ज्वालामालिनी देवी व श्री पद्मावती देवी मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण महोत्सव पार पडला.
यावेळी धर्मसेन भट्टारक स्वामी जैन मठ आम्मीनभावी, लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी नरसिंहराजपुर, स्वस्तीश्री जीनसेन भट्टारक स्वामी नांदणी, ऋषभसेन भट्टारक स्वामीजी लक्कवल्ली, लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी कोल्हापूर त्यांचे प्रमुख उपस्थिती होती.
यजमान अभिनंदन पाटील व विनयश्री पाटील यांच्या हस्ते महा अभिषेक, पंचामृत अभिषेक, पूजा, विधी विधान करण्यात आले. श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे अभिषेक झाल्यानंतर मूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
उपस्थित स्वामींच्या हस्ते जलाभिषेक, ध्वजारोहण, पंचामृत, अभिषेक, महाशांती मंत्र पठण, ज्वालामालिनी तथा पद्मावती विधान, महाहोमहवन, मूर्तीं प्रतिष्ठापना,कळसारोहन करण्यात आले.
कार्यक्रमास द. भा. जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, बस्ती कमिटीचे अध्यक्ष सहकारत्न उत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील, दिपाली पाटील, अभयकुमार करोले, अभयकुमार मगदूम, राजू मगदूम, सागर मिरजे, बाबासो वठारे, डॉ. राजगोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, कुमगोंडा पाटील, भाऊसाहेब पाटील, अनिल कलाजे, सुजाता लगारे जम्बुबलोळे, बी. जे. पाटील, मनोज पाटील, ऋषभ बसन्नावर यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

समिती नेत्यांची धरपकड; महाराष्ट्र-कर्नाटक बससेवेवर परिणाम

Spread the love  बेळगाव : महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समिती नेते व कार्यकर्त्यांची पोलीस प्रशासनाने धरपकड केल्याने …