
निपाणी (वार्ता) : कागिनेले महासंस्थान गुरुपीठ महासंस्थान कनक गुरुपीठ कागिनेले विश्वस्त पदाची निवड सन-१९९२ नंतर प्रथमच महासंस्थान विश्वस्त मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. कागिनले महासंस्थान येथे बैठक होऊन अधिकृतपणे उपनोंदणी कार्यालय ब्याडगी येथे जगद्गुरू श्री निरंजना नंदपुरी स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संस्थांची अधिकृत नोंदणी करण्यात आली. यामध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या विश्वस्त म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी उत्तर कर्नाटकमधून लक्ष्मण चिंगळे (निपाणी) यांची ट्रस्टी म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे बेळगाव जिल्ह्यातील धनगर बाधंवामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी मंत्री एच. विश्वनाथ, एच.एम. रेवन्ना, माजी मंत्री बंड्याप्पा काशामपूर-बिदर, रघुनाथराव मल्लापुरे, आमदार बी.जी. गोविंदआप्पा, आमदार राघवेंद्र इटनाळ-कोप्पळ, गाजीगौडर, बसवराज शिव्वन्नावर, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे-निपाणी,भिमांना मेटी (यादगिरी) अशा एकूण २१ विश्वस्तांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी जगदगुरू श्री निरंजननंद स्वामी याच्या हस्ते नूतन ट्रस्टीचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रथमच नूतन ट्रस्टींच्या नेतृत्वाखाली प्रथम सभा पार पडली. यावेळी संस्थांच्या विकासासाठी व समाजाच्या भविष्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta