अन्नपूर्णा कुरबेट्टी; रोव्हर्स, रेंजर्स विभागाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्याकडून वैश्विक तत्त्वे जोपासून या जगाचे आध्यात्मिक सौंदर्य वाढवणे शक्य आहे. जीवनात मानवी मूल्ये अंगीकारल्यानेच मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो. दैनंदिन जीवनात आपण याचे प्रत्यक्ष पालन कसे केले पाहिजे, याचा धडा ‘स्काऊट आणि मार्गदर्शक’ शिकवतात असे मत बेळगाव जिल्हा भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या राज्य प्रशिक्षक अन्नपूर्णा कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. केएलई संस्थेच्या येथील जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या रोव्हर आणि रेंजर युनिटचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.
आयक्यूएसी समन्वयक डॉ. अतुलकुमार कांबळे यांनी स्वागत केले. रोव्हर्स युनिटचे ऑफिसर डॉ. बसवराज जनगौडा यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एम.एम. हुरळी, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास रेंजर्स युनिटचे ऑफिसर डॉ. एम. डी. गुरुवा, रोवर्स युनिटच्या अधिकारी शशिधार कुंभर, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्नेहा घाटीगे व ईश्वरी दिनिमनी यांनी सूत्रसंचालन केले.