निपाणी (वार्ता) : चौगुले दाम्पत्य शिक्षक येथील विद्यामंदिर शाळेला एक लाख रुपये किमतीचे २५ बेंच प्रदान केले. नामदेव चौगुले व अपूर्वा चौगुले यांनी प्रजासत्ताक दिनी बेंच प्रदान करून दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे.
नामदेव चौगुले हे सध्या अर्जुनी येथील शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक तर त्यांच्या पत्नी अपूर्वा चौगुले या २५ वर्षांपासून विद्यामंदिर शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. अपूर्वा चौगुले यांनी सेवेला २५ वर्षे झाल्यानिनित्त शाळेला २५ बेंच प्रदान केले.
शिक्षिका अपूर्वा चौगुले यांनी, शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून स्कूलसाठी २५ बेंच प्रदान केले. याचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार असून या कार्यातून मनाला समाधान मिळाल्याचे सांगितले.त्यांच्या या कार्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांनीही कौतुक केले आहे. संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.