
निपाणी (वार्ता) : येथील बाळूमामा नगरमध्ये आजी-माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सुभेदार रवींद्र पोवार यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कॅप्टन प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सुभेदार अशोक भोसले, सुभेदार जोतिबा कुंभार, नायब सुभेदार बी. आर. सांगावे, संजय साजने, झाकीर हुसेन नायकवडे, बी. एम. पाटील, मारुती चौगुले, विजय पाटील, गजानन पाटील, दयानंद पाटील, विनायक खोत यांच्यासह आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta