निपाणी (वार्ता) : अंमलझरी येथील रहिवासी सध्या सांगली येथे वास्तव्यास असलेले गोपाळ करंबेळकर व मंगल अरविंद करंबळेकर दाम्पत्यांनी गावातील मुलांच्या शाळेच्या जागेची अडचण पाहून अंगणवाडी शाळेसाठी स्वइच्छेने सव्वा गुंठे जागा देणगी स्वरूपात दिली.
लहान मुलांच्या भविष्यासाठी दान करून याची प्रत सीडीपीओ राममूर्ती यांच्याकडेसुपूर्द केली. यावेळी राममूर्ती म्हणाले, दानत्वाची पद्धत दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये अंमलझरी सारख्या छोट्याशा गावातील ठराविक नागरिकांच्या पुढाकाराने सव्वा गुंठे जागा दान करणारे करंबेळकर परिवार दानशून आहेत. हे काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न असतील.
मंगल करंबेळकर व रोहिणी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजित कौंदाडे, आकाराम कांबळे, कृष्णात बाडकर,वसंत रेपे, सचिन कौंदाडे, रविंद्र मोहिते, यलगोंडा रेपे, गायत्री टोण्णे, एकनाथ कुंभार,कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. बाडकर यांनी आभार मानले.
—