
निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथे शुक्रवारी (ता.९) सकाळी आठ वाजता विशाळी अमावस्या, श्री १००८ भगवान पार्श्वनाथ महामूर्तीचा चरण अभिषेक व विधान आणि वार्षिक सभा व सत्कार समारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी पार्श्वनाथ ब्रह्मा श्रमाचे उपाध्यक्ष जनरत्न रोटे हे उपस्थित जाणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनराज बाकलीवाल, तात्या साहेबांनी बाहुबली नसलापुरे प्रदीप चौगुले शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक या उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक महावीर पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta