
निपाणी (वार्ता) : मराठा समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने अध्यात्म समजून घेणे आवश्यक आहे. समाजाच्या प्रगतीसाठी संघटितपणाची गरज आहे, असे मत श्रीहरी गोसाई हळीहाळ मठाचे मंजुनाथ भारती स्वामींनी व्यक्त केले. येथील राजकुमार सावंत यांच्या निवासस्थानी आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.
रविवारी (ता.११) हळियाळ येथे श्रीहरी छत्रपती शिवाजी
महाराज गुरुकुल भूमीपूजन कार्यक्रम, पट्टाभिषेक, द्वितीय वार्षिकोत्सोव कार्यक्रमप्रसंगी काढण्यात आलेल्या निमंत्रणपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, राजकुमार सावत, डॉ. विनय निर्मळे, विक्रम देसाई, निकु पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती.
स्वामी म्हणाले, समाजासाठी चिंतन करीत असताना एकमेकाला समजून घेण्याची गरज आहे. हळीहाळ येथे होत असलेल्या गुरूकुल निर्माणसाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे. गुरुकुलमध्ये व्यक्तिमत्व विकास, नैतिकता, आत्मविश्वास, शिस्त याचे ज्ञान दिले जाणार असल्याचे सांगितले.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी स्वामीजींच्या कार्याला मराठा बांधवांनी हातभार लावावा. गुरुकुल उभारणीसाठी लवकरच निपाणी भागात बैठक घेणार असल्यास सांगितले. राजकुमार सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उदय कदम, सुधाकर सोनाळकर, नवनाथ चव्हाण, संभाजी पाटील, रमेश भोईटे, नारायण राजगिरे, दीपक वळीवडे, धनाजी भाटले, दिलीप पठाडे, सचिन पोवार, निलेश येरुडकर, अनिल खाडे, भूषण मोहिते, दीपक सावंत यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta