Sunday , July 26 2026
Breaking News

मोहनलाल दोशी विद्यालयाचे विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत उज्वल यश संपादन केले. त्यामध्ये इयत्ता नववी मधील सुदिक्षा मांगोरे, आर्यन चौगुले, स्नेहल कांबळे, प्रीतम खोत तर सहावीतील श्रावणी यादव, देवयानी पाटील, काव्यांजली चौगुले, अर्णव पाटील, सौरभ तिकोडे, पृथ्वीराज दबडे, प्रतीक कदम, ओंकार उंदुरे, अनविक्षित कांबळे या विद्यार्थ्यांची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना एस. एच. श्रीखंडे, ए. डी. लखमले, व्ही. के. परीट, बी. बी. खोंद्रे यांच्यासह मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले. तर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा तृप्तीभाभी शाह यांच्यासह संचालकांचे प्रोत्साहन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *