कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज : उत्पादक हतबल
कोगनोळी : सीमाभागाला वरदान ठरलेल्या दूधगंगा नदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. सीमाभागा लगत असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा व बेळगाव जिल्ह्यात साखर कारखाने असल्याने तंबाखू पिकासाठी प्रसिद्ध असणारा भाग आता झपाट्याने ऊस उत्पादन करण्याकडे वळला आहे.
चालू वर्षाचा गळीत हंगाम ऊस दर आंदोलनामुळे उशिरा सुरू झाला. याचा परिणाम उसाच्या तोडीवर झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस लवकर जावावा व अनेक पिके घ्यावी या उद्देशाने कारखाना ऑफिसचे हेलपाटे घालत आहे. कारखान्याकडून ऊस तोड देण्यात आली तरी ऊसतोड मजुरांच्या कडून ऊस तोडणी साठी पैशाची मागणी केली जात आहे. चालू वर्षी मुळात पाऊस कमी पडल्याने व उसासाठी पोषक वातावरण नसल्याने ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यातच ऊस तोडणी मंजूर पैश्याची मागणी करत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करावेतरी काय असा प्रश्न पडला आहे. संबधित साखर कारखान्यांनी असे पैसे मागणार्या टोळीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
——————————————————————चालू वर्षी पाऊस कमी झाला असून ऊसाला वातावरण पोषक नाही. यामुळे उत्पादनात घट झाली आहे. सध्या ऊस तोडी सुरू असून तोडणीसाठी ऊसतोड मजुरांच्याकडून भली मोठी रक्कम मागितली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
– अणू मोनाप, शेतकरी कोगनोळी,