
निपाणी (वार्ता) : फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, व्हिडीओ कॉलिंगच्या जमान्यात आपली मुले जेव्हा आपल्या पालकांना पत्र लिहितात तेव्हा तो कुठल्याही पालकांसाठी सुखद आठवणीचा साठाच असतो. येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या पाल्यांनी देखील स्वतःच्या पालकांना उद्देशून पोस्ट कार्ड लिहिली.
यावेळी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफीस, विविध पोस्ट सुविधा, पत्रव्यवहाराची माहिती प्रात्यक्षिक रुपात देण्यात आली. पोस्ट मास्तर, सहाय्यक, पोस्टमन मामा हे विद्यार्थीच बनले होते.
यासाठी मुख्याध्यापक विनायक बाचणे, यु. वाय. आवटे, एस. पी. जगदाळे, एस. आर. संकपाळ, एस. के. जोशी, ए. एम. कुंभार, ए. एम. पाटील, एस. एस. कुलकर्णी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta