
माजी मंत्री वीरकुमार पाटील : नगरसेवकांनी शहराचा विकास साधावा
निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर शासननियुक्त पदांच्या निवडी व्हाव्यात यासाठी आपणासह माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी एकत्रित चर्चा केली. सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी या पदांवर योग्य नावांची शिफारस केली. त्यानुसार येथील नगरपालिकेत शासननियुक्त नगरसेवक म्हणून अरुण आवळेकर, फारुख गवंडी, रवींद्र श्रीखंडे, ॲड. संजय चव्हाण आणि लक्ष्मी विनोद बळ्ळारी यांची नियुक्ती झाल्याची माहिती माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी दिली.
येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, राज्यात गत वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सरकार सत्तेत आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांना शासन नियुक्तपदांच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली आहे. शासननियुक्त नगरसेवक निवडताना पक्षानेआपल्या धोरणाप्रमाणे सर्व जातीधर्मांना न्याय दिल्याचे सांगितले.
निवडीनंतर नूतन नगरसेवकांचा सत्कार झाला. यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, माजी सभापती विश्वास पाटील, प्रशांत नाईक, संदीप चावरेकर, नवनाथ चव्हाण, युवराज पोळ, विनोद बळ्ळारी, झाकीर कादरी, वैभव पाटील, संदीप इंगवले, अशोक खांडेकर, बाजीराव बल्लारी, इंद्रजीत बगाडे बाळासाहेब कमते, बाबासाहेब तिप्पे, अवधूत गुरव, सतीश बल्लारी, किसन दावणे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta