Wednesday , April 22 2026
Breaking News

बोर्ड परीक्षेस उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठाचा ग्रीन सिग्नल

Spread the love

 

पाचवी, आठवी, नववी, ११ वीच्या परीक्षा होणार वेळापत्रकानुसार

बंगळूर : एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठाने गुरुवारी इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली. कालच उच्च न्यायालयाच्या एक सदस्य पीठाने या वर्गांच्या बोर्ड परीक्षा घेण्यास स्थगिती दिली होती.
काल, उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने, ज्या उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय पीठाने इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि ११ वीच्या बोर्डाची परीक्षा रद्द केल्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी घेतली. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.
सन २०२३-२४ पासून, राज्य सरकारने कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाद्वारे इयत्ता पाचवी, आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा आयोजित करण्याचा आदेश जारी केला होता. सरकारच्या या आदेशाला आव्हान देत विनाअनुदानित शाळांच्या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने बोर्ड परीक्षा रद्द केली होती. मात्र राज्य सरकारने या आदेशाविरोधात अपील दाखल केले.
११ मार्चपासून बोर्डाची परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. या टप्प्यावर एकसदस्यीय खंडपीठाने शिक्षण विभागाचे परिपत्रक रद्द केल्याने परीक्षा घेण्यात अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी. एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती द्यावी. परीक्षेचे वेळापत्रक तयार आहे, अशी विनंती याचिकेत केली होती. त्यावर, हे खंडपीठ अस्तित्वात नाही. त्यामुळे आज दुसरे खंडपीठ स्थापन करून सुनावणी घेण्याची व्यवस्था केली जाईल, असे मुख्य न्यायमुर्तींनी उत्तर दिले होते. त्यानुसार तातडीने सुनावणी घेऊन परीक्षेवरील स्थगिती उठविण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे ११ ते १९ मार्च दरम्यान होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा आता वेळापत्रकानुसार होणार आहेत.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले की, नववी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात गांभीर्य दिसून येते.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: माजी मंत्री विनय कुलकर्णीसह १६ जणांना जन्मठेप

Spread the love  बंगळूर : धारवाड येथील भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात माजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *