Sunday , September 20 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्या सौ. राजकुंवर पावले यांचा येळ्ळूर साहित्य संघाच्यावतीने सत्कार

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्या सौ. राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपाच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल व खजिनदार रमेश धामणेकर यांनी सौ. राजकुंवर पावले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी परशराम मोटराचे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेल्या पंधरा वर्षात सौ. राजकुंवर पावले यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. सी. एम. गोरल. यांनीही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांनी समाजातील नागरिकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी त्या नक्कीच चोखपणे पार पाडतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सत्कारला उत्तर देताना सौ. राजकुंवर पावले म्हणाल्या, पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली आहे, तेव्हा येळ्ळूर गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्या बरोबरच गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी साहित्य संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले, ग्रामपंचायत सदस्या रेणुका मेलगे, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, साहित्य संघाचे सदस्य सुभाष मजुकर, सामाजिक कार्यकर्ते बळीराम देसुरकर, आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी डॉ. तानाजी पावले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *