जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने लोकसभेच्या मैदानात
निपाणी (वार्ता) : भादोले, (ता. हातकणगले) येथे भटक्या विमुक्त संघटना, यशवंत क्रांती संघटना, जिद्द बांधकाम कामगार संघटना, नरवीर उमाजी नाईक संघटना, बळीराजा पार्टी आणि कर्नाटकमधून रयत संघटना आदींनी एकत्र येऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांचे नाव घोषित केले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शिवाजी माने यांच्यासाठी जीवाचे रान करून त्यांना निवडून आणण्याचा विडा उचलला.
सध्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळली आहे. आजपर्यंत चळवळीत काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ताच निवडून गेला पाहिजे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील जनता ही कायमच सर्वसामान्यांच्या पाठीशी असल्यामुळे शिवाजी माने आणि रविकांत तुपकर बुलढाणा यांची उमेदवारी घोषित करीत असल्याचे कर्नाटक राज्य रयतचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी जाहीर केले. अध्यक्षस्थानी शिरोळचे माजी सभापती अविनाश पाटील होते.
भटक्या विमुक्तचे भीमराव साठे यांनी भटक्या विमुक्त समाजाला घेऊन शिवाजी माने यांच्या पाठीशी राहणार आहेत. सर्वसामान्य जनतेनेही आपल्यातीलच सर्वसामान्य उमेदवार निवडून द्यावे अशे आवाहन केले.
यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संघटनेच्या ३०० शाखा असून या सर्व कार्यकर्ते शिवाजी माने यांच्या मागे उभे करणार असल्याचे वचन दिले. जिद्द बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुतार यांनी, संघटनेचे ७००० सभासद आहेत. सर्वांच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चाने शिवाजी माने यांच्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. इचलकरंजी येथून अभिषेक पाटील यांना इचलकरंजी शहरांमधून यंत्रमाग धारकांना व शेतकऱ्यांना घेऊन आपल्यातील सामान्य उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील जबाबदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरोळ तालुका पिंजून काढून, चळवळीतील कार्यकर्त्याला कायम साथ देणारा तालुका असल्याचे सांगितले. शिरोळ तालुक्यामधून छोटे-मोठे सगळे गट यांना एकत्र करून शिवाजी माने यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जय शिवरायचे सदाशिव कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, जय शिवराय शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष शितल कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सागर निंबाळकर सरकार- नेज, दिपक पाटील, थेरगाव, यशवंत कुंभार, रणजीत पुजारी- शिरढोण, अॕड. संभाजी पाटील, इस्लामपूर बार असोसिएशन माजी अध्यक्ष, राजाराम पाटील, पोपट कदम -अर्जुनवाड, अमित गर्जे आळते, उत्तम पाटील, संभाजीराव साबळे, विजय गायकवाड, शिवाजी शिद, विनोद खिलारे, केशव पाटील, आप्पासो मोरे, धीरज निकम, राजवर्धन घाटगे, बाजीराव पाटील, गणेश पाटील, सागर मुरलीधर कांबळे, संजय पिस्टे, यशवंत मोरे, संदीप गराडे, महादेव गवड, दशरथ सुताल, केशव वारंग, सुनील गणबावले, बाबासो घोलप, विकास यादव, योगेश सुतार, सुनील कांबळे, भगवान धनवडे, रणवीर देसाई, भैरवनाथ मगदूम, प्रताप चव्हाण, नानासो इंगळे, माणिक पाटील यांच्यासह सावर्डे, बोरपाडळे, भादोले, किणी, लाटवडे, सातवे, तासगाव, टोप, संभापूर, पेठ वडगाव, मिणचे, तळसंदे, धरणगुत्ती, कुटवाड, कांदे, सागाव, कोकरुड, शिराळे वारूण, रेठरे, वालूर, डिग्रज, आष्टा, बागणी, तांदुळवाडी, कामेरी, पाडळी, मनपाडळे, उदगाव, कबनूर, हातकणंगले, शिगाव आदी गावातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जय शिवराय किसान संघटनेच्या शाहूवाडी तालुका अध्यक्षपदी रामचंद्र खोपडे यांची निवड करण्यात आली. युवा आघाडी अध्यक्ष महेश मोहिते यांनी स्वागत केले. विजय गायकवाड यांनी आभार मानले.