Tuesday , March 3 2026
Breaking News

पोलीसांची बंदोबस्तासाठी तारेवरची कसरत

Spread the love

 

सीमाभागातील चित्र
कोगनोळी : गावागावातील यात्रा, जत्रा, म्हाई, उरुस, सण, उत्सव, जयंती याचबरोबर सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यामुळे पोलीस प्रशासनावरील कामाचा ताण वाढू लागला आहे. पोलीसांची संख्या अपुरी असल्याने सगळीकडे बंदोबस्त ठेवण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रामनवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती हे उत्सव साजरे होणार आहेत. एकीकडे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. गावागावात बैठकांना जोर आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभा होऊन राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे धार्मिक सण, उत्सव आल्यामुळे पोलीस प्रशासनावर कामाचा ताण वाढू लागला आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता व बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस कमी असताना देखील बंदोबस्त ठेवण्याकरिता पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी आता होमगार्ड मदतीला येत असले तरी पोलीसांची संख्या अपुरी आहे.
निवडणुकीमुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील तपासणी नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *