सहकारत्न उत्तम पाटील ; प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ सभा
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला पडलेले मते पाहता सुमारे एक लाख दहा हजारहून अधिक मते काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना पडली पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे, असे मत सहकार्य उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मीनाक्षी पाटील होत्या.
उत्तम पाटील म्हणाले, गत विधानसभेच्या निवडणूक काळात ज्या पद्धतीने सर्वांनी प्रामाणिकपणे कार्य केले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही सर्वांनी एक दिलाने काम करणे गरजेचे आहे. काँग्रेसची गॅरंटी योजना, राज्यात होत असलेला विकास पाहून आपणही राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगीतले.
उमेदवार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या, काँग्रेस हा पक्ष सर्वसामान्यांचाआहे. गॅरंटी योजनेच्या माध्यमातून शासनाच्या योजना प्रत्येक घरात पोहोचल्या आहेत. वडील सतीश जारकिहोळी यांच्यामाध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी उद्योगपती अभिनंदन पाटील, धनश्री पाटील, अभय मगदूम, पृथ्वीराज पाटील, माणिक कुंभार, तुलसीदास बसवाडे, निरंजन पाटील, गजानन कावडकर, दिगंबर कांबळे, प्रदीप माळी, जावेद मकानदार, शोभा हवले यांच्यासह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.