निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील बिरदेव यात्रेच्या निमित्त साधून मुख्याध्यापक डी. एस. लवटे आणि एस. एस. हजारे या शिक्षक मित्राकडून समाजातील गुणीजणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाघापूर येथील भगवान ढोणे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी शिवाजी ढवणे यांनी स्वागत केले. त्यानंतर सैन्य दलात भरती झाल्याने आप्पासाहेब मायाप्पा हजारे, मारुती अण्णा धनगर आणि आप्पासाहेब बन्ने यांना गौरवण्यात आले. दहावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल वैष्णवी ढवणे, संगीता हजारे, मारुती राणगे, बारावीत विशेष गुणवत्ता मिळवल्याबद्दल सावित्री ढवणे, शिल्पा हजारे, प्रियांका हजारे यांचा भगवान डोणे महाराज व मानवरांच्या हस्ते सत्कार झाला. सैनिक शाळेसाठी निवड झाल्याबद्दल आरव भाऊसाहेब रांगोळे याचा विशेष सत्कार झाला. मुख्याध्यापक लवटे यांनी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला. यापुढील काळात विविध क्षेत्रात सेवानिवृत्त झालेल्या धनगर समाजातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या सत्काराचा उपक्रम हाती घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सत्यापा हजारे, यात्रा कमिटी अध्यक्ष अविनाश हजारे, कल्लाप्पा भानसे, मायाप्पा बन्ने, जकाप्पा हजारे, हालाप्पा ढवणे, पुंडलिक ढवणे, महावीर लवटे, महादेव लवटे, अण्णाप्पा बन्ने, शंकर जानकर यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते. एस. एस. हजारे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta