अभियंते राजेश पाटील; इंजिनीअर असोसिएशनच्या इमारतीचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : शहरात असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सच्या पुढाकाराने बांधलेल्या नव्या इमारतीमुळे ज्येष्ठ अभियंते बी. आर. पाटील व अभियंता बांधवांच्या स्वप्नाची पूर्तता झाल्याचे मत अभियंते राजेश पाटील यांनी व्यक्त केले. येथील व्हनशेट्टी पार्क येथे संघटनेच्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आसिफ मुल्ला होते. यावेळी नगरनियोजन समिती अध्यक्ष संयोगित उर्फ निकू पाटील, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, सेक्रेटरी धनंजय खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजेश पाटील म्हणाले, असोसिएशनच्या जडणघडणीत दिवंगत बी. आर. पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. अभियंत्यांच्या अडचणी सोडविल्या जाव्यात. त्यांकडून समाजाच्या बांधणीत महत्वपूर्ण योगदान निर्माण व्हावे, या उद्देशाने इमारत निर्माण केली आहे. त्यामुळे या वास्तूचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दिलीप पठाडे यांनी, बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांच्या संघटनेने स्वमालकीची इमारत निर्माण करून या क्षेत्रात आदर्शवत कार्य केल्याचे सांगितले. अजय माने यांनी, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स् अँड इंजिनियर्सच्या
१०,००० चौ. फुट जागेपैकी ३,००० स्क्रे फुट जागेत इमारत उभारली आहे. त्यासाठी ज्येष्ठ अभियंते बी. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ अभियंते राजेश पाटील यांनी ११ लाखांचा निधी दिला आहे. संघटनेच्या कामकाजासह सामाजिक उपक्रम राबवल्यासाठी इमारतीचा वापर होणार असल्याचे सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी संघटनेचे सभासद सुरेश रायमाने, राजू हिरेकुडी, नवीन बाडकर, सुदेश बागडी, रामचंद्र वराळे, प्रमोद जाधव, विजय मेथे, सोमनाथ परमणे, उमेश खोत, सी. डी. पाटील, ओंकार वरूटे, ओम पोतदार, युवराज मातीवडर, कैलास कलकवाडे, अमित तांदळे, अमित मोरजकर, ओंकार सुतार, अभिजीत जिरगे, आलोक पाटील, योगेश घाटगे, नितीन रामनकट्टी, प्रथमेश अमित रामनकट्टी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सभासद, बांधकाम क्षेत्रातील नागरिक उपस्थित हाते. संघटनचे अध्यक्ष धनंजय खराडे यांनी आभार मानले.